SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 8 September 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 8 September 2021

| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 9:00 AM

वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. जोरदार बरसलेल्या पावसामुळे वर्धा, वणा आणि यशोदा नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने वर्धा नदीची पाणी पातळी चांगलीच वाढली आहे.

वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. जोरदार बरसलेल्या पावसामुळे वर्धा, वणा आणि यशोदा नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने वर्धा नदीची पाणी पातळी चांगलीच वाढली आहे. पुलगाव परिसरात वर्धा नदीचे  रौद्ररुप पहावयास मिळत आहे. पुलगाव येथून अमरावती जाणाऱ्या जुन्या मार्गावरील वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक महामार्गाने वळविण्यात आली आहे. नदीपातळील वाढ होत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.