अन् नॉटरिचेबलचे झिरवळ रिचेबलचे झाले, माध्यमांसमोर येताच केलं मोठं वक्तव्य
झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद आहेत तर ते गावच्या घरीही उपस्थित नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई : गेल्या अकरा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षावरील प्रकरणाच्या निकालाची तारिख जवळ आली आहे. आज यावर फैसला होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकार तरणार की जाणार? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज सकाळी साडेअकरानंतर निकाल लागण्याची शक्यता असल्याने सर्वपक्षीय नेत्यांची धाकधूक वाढली असतानाच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) नॉट रीचेबल झाले होते. झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद आहेत तर ते गावच्या घरीही उपस्थित नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यानंतर आता ते आता माध्यमांसमोर आले आहेत. त्यामुळे अनेकांची सुरू असलेले घालमेल थांबली आहे. तर समोर येताच, त्यांनी हे सरकार पडणार असल्याचे म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला

