Supriya Sule : एका कार्यक्रमासाठी हगवणेंनी मला बोलावलं होतं, पण.. ; सुप्रिया सुळेंनी सांगितला तो किस्सा
SUpriya Sule On Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील हगवणे कुटुंबाने हुंड्यासाठी सुनेचा छळ केल्याने सून वैष्णवीने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
हगवणे यांनी मलाही एका कार्यक्रमाला बोलावलं होतं. घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणामुळे मी त्या ठिकाणी जाणं टाळलं, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, साधारण एक महिन्या आधी हगवणे यांनी मला एका कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. मात्र याच कारणामुळे मी तिथे जाणं टाळलं. ज्या कुटुंबातली सून घरगुती हिंसाचाराच्या मुद्द्यावर पोलीस ठाण्यात जाते, त्या ठिकाणी कार्यक्रमाला जाणं मला संयुक्तिक वाटलं नाही. म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेले नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे यासाठी पोलिसांना सूचना द्याव्यात अशी मागणी देखील सुळे यांनी केली आहे.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

