अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप

अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप

| Updated on: Sep 01, 2026 | 8:55 PM

सरकार अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करतंय की नाही हेच माहिती नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. आम्ही विचारलेली माहिती मिळत नाहीये. आम्ही न्याय मागतोय, पण सरकार काही उत्तर देत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. चौकशी करतंय का नाही हेच आम्हाला माहिती नाहीये. ह्याच प्रश्नाचं उत्तर पहिलं आम्हाला माहिती नाहीये. एफआयआर करायला आम्हाला किती पापड […]

सरकार अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करतंय की नाही हेच माहिती नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. आम्ही विचारलेली माहिती मिळत नाहीये. आम्ही न्याय मागतोय, पण सरकार काही उत्तर देत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. चौकशी करतंय का नाही हेच आम्हाला माहिती नाहीये. ह्याच प्रश्नाचं उत्तर पहिलं आम्हाला माहिती नाहीये. एफआयआर करायला आम्हाला किती पापड बेलावे पडे. रोहितला कर्नाटकाला जायला आम्ही सगळे राहुलजींशी बोललो म्हणून तर दादाचा एफआयआर झाला. जर राहुलजींनी मदत केली नसती तर दादाचा एफआयआरच झाला नसता. मग त्या एफआयआरचं या राज्यात काय झालं, त्याचं उत्तर आमच्याकडे नाहीये. एकदा माननीय मुख्यमंत्री हाऊसमध्ये बोलले होते. त्याचं पुढे काय झालं आम्हाला माहिती नाही. आता सीबीआयची इन्क्वायरी चाललीये. सीबीआयच्या इन्क्वायरीमध्ये पुढे काय झालं? त्या बॉक्सचं काय झालं? मला माहिती नाही. मी पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारला. आता उत्तरं जी यायला पाहिजेत, अपेक्षित आहेत, ती अजून सरकारकडून आमच्याकडे आलेली नाहीत ऑफिशिअली. म्हणजे आम्ही विचारत राहिलो ऑफिशिअली. ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस. पार्लमेंट हे सगळ्यात उच्च जागा आहे न्याय मागण्यासाठी. तिथे आम्ही दादासाठी न्याय मागतोय. तिथे मला आजपर्यंत उत्तर आलेलं नाही.

Published on: Sep 01, 2026 8:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us