AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आवाज उठवला म्हणून जितेंद्र आव्हाडांना अटक असेल तर स्वागत, पण मी पाहिलेल्या व्हिडिओत… सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

हर हर महादेव चित्रपटातील वादग्रस्त प्रसंगांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला वाटतं राजकीय पक्ष बाजूला ठेवू आणि इतिहासकारांनी एकत्र येऊन चर्चा करावी.

आवाज उठवला म्हणून जितेंद्र आव्हाडांना अटक असेल तर स्वागत, पण मी पाहिलेल्या व्हिडिओत... सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 11, 2022 | 4:36 PM
Share

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आवाज उठवल्यामुळे त्यांना अटक झाली असेल तर त्याचं स्वागत आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivsaji Maharaj) इतिहास खोटा सांगितला जात असेल आणि त्याविरोधात आवाज उठवला जात असेल तर आम्हा सर्वांना अटक झाली तरी चालेल. आम्ही सर्व जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही जेलभरो आंदोलन करायला तयार आहोत, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मांडली.

जितेंद्र आव्हाड यांना आज वर्तक नगर पोलीसांकडून अटक करण्यात आली. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडण्यासाठी आंदोलन केलं होतं. यावेळी प्रेक्षकांना मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय.

या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना आज अटक करण्यात आली. या घटनेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर कुठून दबाव येतोय? ही अटक कोणत्या सेक्शनखाली होतेय? व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड मारमारी करताना दिसतायत का?

मी व्हिडिओ पाहिला, त्यात आव्हाड हाताची घडी घालून उभे आहेत. मग शांत बसला तरी गुन्हा ठरतो का? सत्ता काबीज करण्यासाठी यांना काय काय करावं लागतंय.. शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती देत असाल तर चुकीचं आहे. यामागे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे, हे शोधा, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय.

हर हर महादेव चित्रपटातील वादग्रस्त प्रसंगांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला वाटतं राजकीय पक्ष बाजूला ठेवू आणि इतिहासकारांनी एकत्र येऊन चर्चा करावी. गांधी हा सिनेमा उत्तम होऊ शकतो. तर हा सिनेमा का व्यवस्थित होऊ शकत नाही? मी इतिहास वाचलाय, त्यात असं काही नव्हतं, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत