Karuna Sharma Video : ‘खोक्या’चं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं घर जाळा, करूणा शर्माची मागणी
सतिश भोसलेचं घर पाडण्यासाठी घाई का केली? असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. वनजमिनीचं वाटप करण्यात आल्याची माहिती आहे असं म्हणत धस यांनी या प्रकरणामध्ये ट्विस्ट आणलाय.
वन विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर घर असल्याचा ठपका ठेवत खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. मात्र वनपट्ट्याच्या जमिनीचं वाटप झालं होतं अशी ही माहिती आहे. त्यामुळे शिरूर कासारमध्ये जाऊन विचारणा करणार असं भाजपचे आमदार सुरेश धस म्हणालेत. खोक्या उर्फ सतीश भोसले हा आपलाच कार्यकर्ता असल्याचं सुरेश धस यांनी याआधीच सांगितलंय आणि आता ज्या पद्धतीने त्याच्या घरावर कारवाई झाली त्यावरून धस यांनी काही सवाल केलेत. ज्या दिवशी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घर पाडलं त्याच दिवशी रात्री काही गावगुंडांनी पाडलेलं घरही पेटवलं. त्यावरून करुणा मुंडे यांनी वाल्मिक कराडचं घर जाळाअसं म्हटलंय. खोक्या भोसले सोबत आपला एक फोटोही व्हायरल केला जात असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलंय. गहिनीनाथगडावर जाताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा खोक्याने दर्शनासाठी मदत केल्याचही करुणा मुंडे यांनी सांगितलं. ढाकणे पितापुत्रांना मारहाण प्रकरणी खोक्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. हरिण पकडण्यासाठी विरोध केल्याने मारहाण केल्याचा आरोप खोक्यावर आहे. त्यानंतर पोलिसांनी खोक्याला बावी गावात घटनास्थळी आणत चौकशी केली. याच ठिकाणी याआधीही हरिणांची शिकार केल्याचा संशय पोलिसांना आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड

पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती

विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
