Phaltan Doctor Case : ‘त्या’ 7 सवालांचे उत्तरं कोण देणार? अंधारेंनी सरकार अन् पोलीस यंत्रणेलाच घेतलं फैलावर
सुषमा अंधारे यांनी फलटणमधील मृत महिला डॉक्टर प्रकरणी सरकार आणि पोलीस यंत्रणेला सात गंभीर प्रश्न विचारले आहेत. हा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अंधारे यांनी चौकशीतील विसंगतींवर बोट ठेवले आहे. पोलिसांसह रूपाली चाकणकर यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी त्यांची मागणी आहे.
फलटणमधील मृत महिला डॉक्टरच्या प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळातून प्रश्न विचारले जात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाला आत्महत्या की हत्या, असा सवाल करत सरकार आणि पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अंधारे यांनी एकूण सात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले असून, त्यांची उत्तरे देण्याची मागणी केली आहे. त्यांनी विचारले आहे की, तक्रारीसाठी चार पानी पत्र लिहिणाऱ्या महिलेने आयुष्य संपवताना हातावर चार ओळी का लिहिल्या असाव्यात? तसेच, आत्महत्येच्या नोटमध्ये खाडाखोड कशी काय असू शकते? हातावर लिहिलेले गळफास घेताना खोडले जाऊ शकते, हे आत्महत्या करणाऱ्याला कळणार नाही का, असे अनेक मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी आणि पत्रकार परिषदेनं टीकेच्या धनी ठरलेल्या रूपाली चाकणकर यांनी द्यायला हवीत, असे अंधारे यांनी म्हटले आहे. यापूर्वी तनिष्का भिसे आणि हगवणे प्रकरणात दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचीही उत्तरे जनतेला मिळायला हवीत, असेही अंधारे यांनी नमूद केले. या प्रकरणात अधिक पारदर्शकतेची आणि तातडीने चौकशीची मागणी जोर धरत आहे.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

