Phaltan Doctor Case : मोठा ट्विस्ट… डॉक्टर महिलेची हत्या की आत्महत्या? अंधारेंनी थेट हस्ताक्षरातील दाखवला फरक अन्…
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत सुसाईड नोटच्या हस्ताक्षरावर आणि पोलिसांच्या मृत्यूच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांवर संशय व्यक्त करत, त्यांनी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचीही मागणी अंधारेंनी केली.
फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात एक महत्त्वाचा ट्विस्ट समोर आला आहे. सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेऊन हा खून की आत्महत्या, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी मृत महिलेच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवर आणि पोलिसांनी दिलेल्या मृत्यूच्या वेळेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अंधारेंनी दावा केला की, सुसाईड नोटमधील निरीक्षक शब्दाची वेलांटी, मृत डॉक्टर संपदा मुंडेंच्या चार पानी पत्रातील त्याच शब्दाच्या वेलांटीपेक्षा वेगळी आहे, ज्यामुळे सुसाईड नोट दुसऱ्या कोणीतरी लिहिली असल्याचा संशय बळावला आहे.
अंधारेंनी पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला. पोलिसांनी डॉक्टरचा मृत्यू संध्याकाळी ७ वाजता झाल्याचे सांगितले, मात्र संपदाने रात्री ११ वाजून ६ मिनिटांनी तिच्या बहिणीच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर लाईक केले होते, असे पुरावे अंधारेंनी सादर केले. त्यामुळे मृत्यूच्या वेळेबाबतही संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस संशयाच्या भोवऱ्यात असल्यामुळे याची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय समितीमार्फत व्हावी, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

