AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Empire Map: मराठा साम्राज्याचा नकाशा NCERT पुस्तकातून हटवला, राजपूत घराण्यांचा दबाव? नागपूर राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले आक्रमक

Maratha Empire map remove from Class 8 NCERT book : एनसीआरटीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा तत्कालीन नकाशा हटवण्यात आला आहे. याप्रकरणी नागपूर राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिक्षण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे.

Maratha Empire Map: मराठा साम्राज्याचा नकाशा NCERT पुस्तकातून हटवला, राजपूत घराण्यांचा दबाव? नागपूर राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले आक्रमक
मराठा साम्राज्याचा इतिहासImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 25, 2026 | 3:08 PM
Share

Mudhoji Raje Bhosale : NCERT इयत्ता ८ वीच्या पाठ्य पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटल्याचा वाद पेटला आहे. नागपूर राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी याविषयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण मंत्री आणि NCERT ला त्यांनी पत्र लिहिलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत या संदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणात फडणवीस यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे भोसले म्हणाले.

काय आहे प्रकरण?

1759 मध्ये मराठा साम्राज्याचा कटक ते अटक असा विस्तार दाखवणारा नकाशा NCERT च्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता. पण हा नकाशा चुकीचा असून राजस्थानधील काही भागांवर मराठ्यांचं अधिपत्यही नव्हतं आणि त्यांनी कधी चौथाई, देशमुख वसूल केली नसल्याचा राजस्थानमधील राजघराण्यांचा दावा होता. राजस्थानमधील काही राजघराण्यांनी हा नकाशा हटवण्याची मागणी केली. वादाच्या पार्श्वभूमीवर एनसीईआरटीने शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी आठवीच्या पुस्तकातून संबंधित नकाशा हटवला. नवीन पुस्तकात हा नकाशा वगळण्यात आला. त्याकडे नागपूर घराण्याचे मुधोजीराजे भोसले यांनी लक्ष वेधले आहे.

मराठा इतिहासाची गळचेपी का?

नागपूर राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच एनसीआरटीला सुद्धा या संदर्भात पत्र पाठवत याप्रकरणी तीव्र निषेध नोंदवला. महाराष्ट्राचा तेजस्वी मराठा इतिहासाची गळचेपी? होत असल्याचा म्हणत वातावरण तापले आहे. मराठा साम्राज्याच्या ध्वज पुस्तकाचा कागदावरच नाही तर तो या मातीच्या कणाकणात आहे. राजस्थानसह विस्ताराचा नकाशा ‘जसाच्या तसा’ पूनर्समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

NCERT ला लिहिलेले पत्र इथं वाचा  Maharaja Of Nagpur – NCERT – PM

चौथाई, देशमुखी वसुलीचे पुरावे

राजस्थान मधील जयपूर जोधपूर आणि उदयपूर यासारख्या प्रमुख सत्ता मराठ्यांच्या अधिपत्याखाली होत्या तिथून चौथी आणि सर्व देशमुखी सुद्धा वसूल केली जात होते असे पुरावे आहेत. ऐतिहासिक असंख्य पुरावे असताना काही समाजाच्या दबावाचा आरोप, राजस्थानचा मोठा भूभाग समाविष्ट होता तो नकाशा तात्काळ पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी भोसले यांनी केली.

महाराष्ट्र सरकारने महराष्ट्राची अस्मिता म्हणून ठोस भूमिका मांडून केंद्र आणि NCERT कडे मांडून आक्रमक पाठपुरावा करावा. इतिहास वळवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,मराठ्यांचा इतिहास हा देशाचा कणा आहे, तो वाकवण्याचा प्रयत्न करू नये, तातडीने याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी आणि पाठपुरावा करावा अशी मागणी मुधोजी राजे भोसले यांनी केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...