Ratnagiri मध्ये स्वॅब टेस्ट न करणाऱ्यांवर कारवाई होणार, पोलीस अधीक्षकांची माहिती

सध्या राज्यातील कोरोनाच्या प्रमुख हॉटस्पॉटपैकी असलेल्या रत्नागिरीत प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. रत्नागिरीत कोरोनाचा (Coronavirus) स्वॅब स्टेस्ट न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. कारण स्वॅब टेस्टला नकार देणाऱ्या व्यक्तीविरोधात आता थेट गुन्हा दाखल होणार आहे. 

राज्यात कोल्हापूरनंतर रत्नागिरी हा सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्हिटी असणारा जिल्हा आहे. मध्यंतरी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करुनही रत्नागिरीत फारसा फायदा झाला नव्हता. आतादेखील रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दिवसाला 500 हून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला आहे. कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी संपर्कात आलेल्यांचे आरटीपीसीआर टेस्टची संख्या प्रशासनाने वाढवली आहे. पण स्बॅब टेस्टला विरोध करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI