Dattatray Gade Arrest : दत्तात्रय गाडेने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, वैद्यकीय तपासणीतून काय आलं समोर?
Accused Dattatray Gade News : स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान ही बाब समोर आल्याचं ते म्हणाले.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपीच्या मानेवर जखमा आढळून आल्या आहेत, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. वैद्यकीय तपासणी दरम्यान गाडेच्या मानेवर जखमा आढळून आल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटलं आहे.
दत्तात्रय गाडे हा स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी असून त्याला काल मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यादरम्यान, त्याच्या मानेवर जखमा दिसून आल्या. आज पत्रकार परिषदेत याबद्दल बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, आरोपीची प्राथिमक आरोग्य तपासणी झाली. त्याच्या गळ्यावर मार्क आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. दोरी तुटली आणि लोकांनी घटनास्थळी जाऊन त्याला वाचवल्याने त्याने आत्महत्या केली नसल्याचं तो सांगतो, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

