Satara | तामजाई नगरमध्ये अपार्टमेंटमधील फ्लॅटला भीषण आग, जीविताहानी नाही

तामजाईनगर मधील श्री नगरी येथील शिवामृत बिल्डींगमध्ये आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली. विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून काल हे कुटुंब परगावी गेले आहे. मात्र आज सकाळी अचानक फ्लॅटमधून आगीचे लोट बाहेर पडत होते.

सातारा : तामजाईनगर मधील श्री नगरी येथील शिवामृत बिल्डींगमध्ये आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली. विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून काल हे कुटुंब परगावी गेले आहे. मात्र आज सकाळी अचानक फ्लॅटमधून आगीचे लोट बाहेर पडत असल्याचे काही  नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला बोलावून ही आग विझविण्यात आली.  या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी फ्लॅटमधील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे….

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI