Team India Victory Parade : वेलकम ‘चॅम्पियन्स’… टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर दणक्यात आगमन

Team India players reached at Mumbai airport : टीम इंडियाची मरीन ड्राईव्ह परिसरातूनच विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. आपल्या लाडक्या क्रिकेटस्टार्सची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. अशातच मोठ्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. पण अद्याप टीम इंडियाच्या खेळाडूंची बाहेर पडण्याची प्रतिक्षा

Team India Victory Parade : वेलकम 'चॅम्पियन्स'... टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर दणक्यात आगमन
| Updated on: Jul 04, 2024 | 5:56 PM

T-20 विश्व विजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह येथे क्रिकेटप्रेमी, चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. टीम इंडियाची मरीन ड्राईव्ह परिसरातूनच विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. आपल्या लाडक्या क्रिकेटस्टार्सची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. अशातच मोठ्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. पण अद्याप टीम इंडियाच्या खेळाडूंची बाहेर पडण्याची प्रतिक्षा चाहत्यांना करावी लागत आहे. थोड्याच वेळात रोहितसेना आपल्या लाडक्या वर्ल्ड कप ट्रॉफीसह मैदानावर एन्ट्री घेणार आहे. हा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी असंख्य क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. गुजरातमधील डबलडेकर ओपन डेक बसमधून व्हिक्ट्री परेड काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीची सांगता वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत खास सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, नरीमन पॉईंट आणि वानखेडे परिसरात जमलेल्या क्रिकेटप्रेमींकडून हिटमॅनच्या नावाचीच घोषणा करण्यात येत आहे

Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.