गुलाबी वादळ पश्चिम महाराष्ट्रातही घोंगावणार? सोलापूरनंतर केसीआर यांचा सांगली-कोल्हापूर दौरा
त्यांनी, 600 गाड्यांच्या ताफ्याबरोबर पंढरपूरमध्ये येत विठ्ठलाचे दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला आहे. तर केसीआर यांच्या पंढरपूर भेटीनंतर आता पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरून आता राजकारण तापले आहे.
मुंबई, 30 जुलै, 2023 | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात दमदार एन्ट्री केली होती. त्यांनी, 600 गाड्यांच्या ताफ्याबरोबर पंढरपूरमध्ये येत विठ्ठलाचे दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला आहे. तर केसीआर यांच्या पंढरपूर भेटीनंतर आता पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरून आता राजकारण तापले आहे. तसेच ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. विशेष म्हणजे याच्या आधी केसीआर यांनी गुलाबी वादळ घेऊन सोलापूरमधील राष्ट्रवादीला खिंडार पाडले होते. त्यानंतर आता त्यांचा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा 1 ऑगस्टला होणार आहे. तर 1 ऑगस्ट ते रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिवसानिमित्त वाटेगाव येथे येत आहेत. ते त्यांत्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao
Published on: Jul 30, 2023 01:25 PM
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
