AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुळ्यात Mumbai- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, केमिकलच्या टँकरला भीषण आग

| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 7:40 PM
Share

रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरमधून उग्र वास येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाहीये.

धुळे : मुंबई -आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highwayकंटेनर आणि केमिकल वाहतूक करणाऱ्या टॅँकरमध्ये भीषण अपघात (Accidentझाल्याची घटना समोर आली आहे. हाडाखेड – पलासनेर गावाच्या परिसारामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. अपघातातनंतर टँकरला आग लागली, या आगीमध्ये ड्रायव्हर आणि क्लीनरचा जळून मृत्यू झाला आहे. कंटेनरमध्ये (containersकाही ट्रॅक्टर होते. ट्रॅक्टरच्या टायरने पेट घेतल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. आग पसरल्याने संबंधित टॅंकरने देखील पेट घेतला, या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, अपघातग्रस्त वाहने जळून खाक झाली आहेत. रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरमधून उग्र वास येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाहीये.