Thackeray Brothers Morcha : ठरलं… मोर्चा यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू, ठाकरे गट अन् मनसेच्या ‘या’ नेत्यांवर जबाबदारी
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाची घोषणा झाल्यानंतर दोन्ही राजकीय पक्ष मराठी भाषेचं अस्तित्व टिकावं यासाठी मैदानात उतरले आहे. दोघांकडून मोर्चा यशस्वी होण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत तर दोन्ही पक्षांतील काही नेत्याना जबाबदारी वाटप करण्यात आली आहे.
मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून सकाळी दहा वाजता हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंकडून एकत्रित महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही मराठी टिकावी यासाठी हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात आपला सहभाग दर्शविण्याचे आवाहन केले आहे. अशातच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेकडून तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गट आणि मनसेकडून आपापल्या पक्षातील काही नेत्यांवर या मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि आमदार वरूण सरदेसाई यांच्यावर जबाबदारी असणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

