Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची 22 दिवसात ‘मातोश्री’वर दुसरी भेट, तिसऱ्या भेटीचा मुहूर्तही ठरला! पुन्हा युतीच्या चर्चांचा समेट?
आतापर्यंत ठाकरे बंधूंच्या दोन वेळा प्रत्यक्ष भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता पुढची भेट कधी याचा मुहूर्त देखील समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आतापर्यंत थेट प्रत्यक्ष दोन भेटी झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या जुलै महिन्यात पाच तारखेला मराठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाकरे बंधूंमध्ये पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे थेट मातोश्री येथे दाखल झाल्याचे पाहायला मिळाले होते. या भेटीनंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या भेटीचा पुढचा मुहूर्त गणेशोत्सवाचा असल्याची माहिती समोर येत आहे. येणाऱ्या गणेशोत्सवात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. २७ ऑगस्ट किंवा २८ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी जाण्याची शक्यता असल्याची माहिती देखील सूत्रांकडून समजतेय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

