ठाकरे बंधूंची जवळीक अन् शिंदेंचं टेंशन वाढलं! मोठं कारण आलं समोर
ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या पक्षप्रवेशांना ब्रेक लागल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या पक्षप्रवेशांना ब्रेक लागल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होणारे प्रवेश हे गेल्या काही दिवसांपासून थांबले असल्याची आता चर्चा आहे. विशेष म्हणजे मुंबईतील माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश थांबले आहेत अशी माहिती समोर आली आहे.
गेल्या महिनाभरात ठाकरे बंधूंच्या 2 वेळा भेटी झाल्या आहेत. याच कारणाने शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या पक्ष प्रवेशांना ब्रेक लागला असल्याचं बोललं जात आहे. दर 8 ते 15 दिवसांनी होणारे पक्षप्रवेश हे सध्या थांबले असल्याचं दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी पक्ष प्रवेशाचा सपाटा लावला होता. त्यामुळे पक्षातील गळती रोखण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. अशातच मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधु एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे पालिका निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्यातल्या युतीच्या चर्चेने जोर धरला. त्यातच काल उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास आगामी निवडणुकीत याचा फायदा होईल असं राजकीय जाणकारांचं म्हणण आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याच्या विचारात असलेल्या माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आता सावध भूमिका घेतली आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

