Raj – Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंचा मेळावा; जय्यत तयारी सुरू, दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी
MNS-Shivsena UBT : ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची तयारी आता सुरू झाली असून मनसे आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी करण्यात आली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी करण्यात आली आहे. 5 जुलै रोजी होणाऱ्या विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली आहे. त्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, तर ठाकरे गटाकडून साईनाथ दुर्गे यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर इतरही पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर मोठ्या थाटात वरळी डोममध्ये 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडणार आहे. त्यासाठी आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जय्यत तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बऱ्याच वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या मेळाव्यातून ठाकरे बंधु युतीची घोषणा करतील का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

