आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलवण्यात आली आहे. दुपारी अडीच वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल. ठाकरे सरकारची (Thackeray Government) ही शेवटची कॅबिनेट ठरणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. बंडखोरीच्या पार्श्वभूमीवरती आजच्या कॅबिनेट बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर झालेली ही दुसरी कॅबिनेट बैठक आहे. कालच कॅबिनेटमधील खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले होते. त्यानंतर आज होणारी ही पहिलीच कॅबिनेट बैठक (Cabinet meeting) असणार आहे. या बैठकीमध्ये नेमके काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.