ठाकरे गटाचा मोठा निर्णय, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अन् बजोरिया यांना अपात्र करा; विधीमंडळ सचिवांना लिहिलं पत्र
ठाकरे गटाने आज अधिवेशनाच्या पहिल्याच मोठा निर्णय घेतला आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि बाजोरिया यांनाअपात्र करा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने यासाठी विधीमंडळ सचिवांना पत्र लिहिलं आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 | मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या तिघांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाने आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिघांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाने तसं पत्रच विधीमंडळ सचिवांना दिलं आहे. त्यामुळे या तिन्ही आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच या आमदारांच्या अपात्रतेवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Jul 17, 2023 01:30 AM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

