ठाकरे गटातील नेत्यांच्या नाराजीनाट्यावर पडदा, अंबादास दानवेंची रूसवे-फुगवे अखेर दूर
संभाजीनगरात चंद्रकांत खैरेंची भेट घेतल्यानंतर आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं दानवे यांनी स्पष्ट केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे महायुतीकडून खैरे यांच्या विरोधात संदीपान भुमरेंच्या मुलाला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.
अंबादास दानवेंची नाराजी अखेर दूर झाली आहे. संभाजीनगरात चंद्रकांत खैरेंची भेट घेतल्यानंतर आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं दानवे यांनी स्पष्ट केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे महायुतीकडून खैरे यांच्या विरोधात संदीपान भुमरेंच्या मुलाला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. दरम्यान, संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची भेट घेतल्यानंतर या नाराजीनाट्यावर पडदा पडल्याचे पाहायला मिळत आहे. अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची भेट घेऊन त्यांचा सत्कार करत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर अंबादास दानवेंनी अनेकदा नाराजी व्यक्त करून दाखवली होती. श्रीनिवास पाटलांचा निर्णयाचा दाखला देत त्यांनी अप्रत्यक्षरित्या चंद्रकांत खैरेंना टोला देखील लगावला होता. मात्र, खैरेंच्या भेटीनंतर आता अंबादास दानवेंचे सूर बदलल्याचे पाहायला मिळाले आहे. बघा स्पेशल रिपोर्ट
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका

