मुंबईतील मतदानाच्या भोंगळ कारभारावर ठाकरे गटाचं बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल
'निवडणूक आयोगाची मतदानाच्या दिवशी असणारी व्यवस्था ही गैर असल्याचे उघडपणे दिसत होती. भर उन्हात मतदार मतदान करण्यासाठी आलेले त्यांची गैरसोय दिसली. निवडणूक आयोगाने व्यवस्था केली नाही. बुथमध्ये उकाडा होता, लाईट डीम होती, मतदारांना आपल्या उमेदवाराची निशाणी शोधावी लागत होती'
मुंबईत मतदान संथ गतीने का झालं? असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असे म्हटले की, निवडणूक आयोगाची मतदानाच्या दिवशी असणारी व्यवस्था ही गैर असल्याचे उघडपणे दिसत होती. भर उन्हात मतदार मतदान करण्यासाठी आलेले त्यांची गैरसोय दिसली. निवडणूक आयोगाने व्यवस्था केली नाही. बुथमध्ये उकाडा होता, लाईट डीम होती, मतदारांना आपल्या उमेदवाराची निशाणी शोधावी लागत होती. हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. हा असा साजरा करायचा का? मतदान संथगतीने का झाले? असे सवाल उपस्थित करून ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सरकारवर निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, जे पुरावे मतदान करताना लागतात त्यात निवडणूक आयोगाचे कार्ड दिल्याशिवाय मतदान करू दिले नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड काही ठिकाणी ग्राह्य धरले नाहीत, असे प्रकार महाराष्ट्रात घडलेत, असं म्हणत अनिल देसाई यांनी संथ गतीने झालेल्या मतदान प्रक्रियेवर बोट ठेवत आयोगावरही ताशेरे ओढले.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

