निलेश राणे हे आमच्यादृष्टीने कचरा, ठाकरे गटाच्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
VIDEO | मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. निलेश राणे यांच्या राज्याच्या सक्रीय राजकारणातून बाजूला होणार असल्याच्या घोषणेमुळे राजकारणात खळबळ, अशातच ठाकरे गटातील नेत्यानं हल्लाबोल केला
मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असे स्पष्टपणे म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. यावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोकणात निलेश राणे आणी भास्कर जाधव हे एकमेकांचे कट्टस प्रतिस्पर्धी मानले जात असल्याची चर्चा कायम असते. यासंदर्भात भास्कर जाधव यांना सवाल केला असता भास्कर जाधव यांनी निलेश राणे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केल्याचे पाहायला मिळाले, भास्कर जाधव म्हणाले, ‘निलेश राणे आमचा कधी प्रतिस्पर्धी नव्हता. निलेश राणे कुठे आणि मी कुठे?’ असा खोचक सवाल केला तर निलेश राणे आमच्यादृष्टीने कचरा आहेत, असे म्हणत भास्कर जाधव यांनी जिव्हारी लागणारी टीका निलेश राणे यांच्यावर केली.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

