Sanjay Raut Video : ‘उदय सामंतांचंच ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही’, राऊतांचा ‘ऑपरेशन टायगर’वरून टोला
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणि काँग्रेसचे काही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू आहे. शिंदे यांच्या या 'ऑपरेशन टायगर'वरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन ‘टायगर’ सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणि काँग्रेसचे काही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये रवींद्र धंगेकर, महादेव बाबर आणि रमाकांत म्हात्रे हे शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार का याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासोबत सुभाष बने, गणपत कदम, चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसतेय. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या ‘ऑपरेशन टायगर’वरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’वरून एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. तर ‘उदय सामंत यांचं नाव घेता, त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केलं. पण त्यांचंच ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही.’, असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला तर ‘जे टायगर आहेत. त्यांचं प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सुरू आहे, झालेलं आहे. आताचं ऑपरेशन टायगर म्हणजे…’, बघा संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण

