राज ठाकरे फुसका… ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरे आणि नारायण राणे हे रत्नागिरीच्या कणकवलीमध्ये एकाच मंचावर उपस्थित असणार आहे. यावेळी राज ठाकरे यांची तोफ कणकवलीत धडाडणार असल्याचे म्हटले जातंय. यावरून विनायक राऊत यांना सवाल केला असता विनायक राऊतांना राज यांच्यावर सडकून टीका केली
राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी फटाका आहे, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभा लढवणारे उमेदवार विनायक राऊत यांनी केलंय. तर राज ठाकरे यांच्या सभेमुळे कोकणात काही फरक पडणार नाही, असे म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवार केला आहे. आम्ही फुसकी लवंगी की अॅटम बॉम्ब हे ४ तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर कळेल…असं प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी विनायक राऊत यांना दिलं आहे. राज ठाकरे आणि नारायण राणे हे रत्नागिरीच्या कणकवलीमध्ये एकाच मंचावर उपस्थित असणार आहे. यावेळी राज ठाकरे यांची तोफ कणकवलीत धडाडणार असल्याचे म्हटले जातंय. यावरून विनायक राऊत यांना सवाल केला असता त्यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

