कोकणात ठाकरेंचा बुरूज ढासळत चालला? भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्…
तीन दिवसांआधीच राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या आणखी एका कोकणातल्या माजी आमदारांना धनुष्यबाण हाती घेतलाय. त्यातच उदय सामंतांनी भास्कर जाधवांना जी ऑफर दिली त्यावर जाधव यांनी देखील भूवया उंचावणारी एक प्रतिक्रिया दिली.
दोन दिवसांआधीच राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंचे कोकणातले एकमेव आमदार भास्कर जाधव यांनाही उदय सामंतांनी ऑफर दिली. आणि आता भास्कर जाधव यांनीही असंच प्रेम कायम राहू द्या, असं म्हणत भूवया उंचावल्यात. जाधव इतक्यावरच थांबले नाहीत तर माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. म्हणजे इशारा थेट उद्धव ठाकरे यांनाच देण्यात आला. कोकणात शिंदेंच्या शिवसेनेचे आठ आमदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव हे एकमेव आमदार आहेत आणि ठाकरेंचे पराभूत आणि माजी आमदार यांच्याकडेही ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेने मोर्चा वळवलाय. त्याचाच एक भाग म्हणून माजी आमदार सुभाष बने यांनी शिवबंधन तोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
आता रत्नागिरीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. तीन दिवसांआधीच माजी आमदार राजन साळवी यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या निमित्ताने झालेल्या रत्नागिरीतल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. फोडाफोडी कराल तर डोकी फुटतील असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदेंना दिला होता. तर रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरेंना इशारा देत पुढच्या दोन वर्षात शिल्लक आमदारही राहणार नाहीत असं म्हटलय. कोकणात एकूण पंधरा आमदारांपैकी चौदा आमदार महायुतीचे आहेत एकमेव भास्कर जाधव यांच्याकडेही शिंदेंच्या शिवसेनेने नजर टाकली आहे. आता भास्कर जाधव पुढे काय करतात हे दिसेलच. पण माजी आमदारांनाही सोबत घेऊन कोकणातल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा बुरूज पाडण्याच काम शिंदेंच्या शिवसेनेन सुरू केले आहे.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
