Sanjay Raut : … ही गृहमंत्रालयाची विकृती, संजय राऊत यांचा ‘त्या’ राड्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. याप्रकरणावरून दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप होताय. तर शिवसैनिकांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही विकृती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलंय
मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. याप्रकरणावरून दोन्ही गटाकडून चांगलेच आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. दरम्यान याप्रकरणी काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले, ‘हे दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे आहेत. शिवसैनिकांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही विकृती आहे. त्यावर गृहमंत्र्यानी या विकृतीवर तोडगा काढला नाही. पण अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या शिसैनिकांवर जे गद्दार, बेईमान आणि राजकीयदृष्ट्या भ्रष्ट आहेत. त्यांना शिवतीर्थावरावर रोखण्याचा प्रयत्न झाला. पण ज्यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करून या सरकारची विकृती उघड केली असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

