AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने

Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने

| Updated on: Oct 05, 2026 | 5:08 PM
Share

विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने अमरावती शिक्षक मतदारसंघातून दत्तात्रय लहाने आणि संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून दिलीप घुगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमरावतीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून, शहाजी बापू पाटलांनी मंगेश चिवटेंना समर्थन नसल्याचे स्पष्ट केले आहे, ज्यामुळे महायुतीतही नाराजी दिसून येत आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी ठाकरे गटाने (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी दिलीप घुगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः अमरावतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतरही ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्याने ही बिघाडी समोर आली. काँग्रेसकडून अदिती पोहरे तर ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने हे उमेदवार असणार आहेत, त्यामुळे येथे मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महायुतीमध्येही अंतर्गत संघर्ष दिसून येत आहे. शहाजी बापू पाटील यांनी मंगेश चिवटे यांना आपले समर्थन नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, चिवटेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मी सहभागी नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील त्याचे पालन करू. शिवसेनेला ही जागा मिळावी यासाठी सर्व नेत्यांनी उठाव केला असल्याचेही त्यांनी नमूद केले. अमरावतीमध्ये किरण सरनाईक शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर महायुतीकडनं अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही. शेखर भोयर देखील अपक्ष आणि भाजपच्या वतीने अर्ज भरणार आहेत.

Published on: Oct 05, 2026 05:08 PM

Follow Us