ठाण्यातील घंटाळी परिसरात गोळीबार, दोन गटात वादाचं कारण काय?
संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्याच्यासोबत त्याचे सहकारीदेखील होते.
निखिल चव्हाण, ठाणेः ठाण्यातील (Thane) घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबार (Firing) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. दोन गटांमध्ये संपत्तीच्या (Property) वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजत आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्याच्यासोबत त्याचे सहकारीदेखील होते. आपल्या कार्यालयात ते रात्रीच्या वेळी ते कंदील लावण्याचं काम करत होते. त्याचवेळी हल्लेखोर तिथे पोहोचले आणि गोळीबार केला. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून. दरम्यान नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

