Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट होताच चर्चेला उधाण?

Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट होताच चर्चेला उधाण?

| Updated on: May 28, 2026 | 3:31 PM

ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाने या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच भाजपनेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाने या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच भाजपनेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात भाजपची वाढती ताकद लक्षात घेता ही जागा भाजपने लढवावी, अशी चर्चा पक्षात सुरू आहे.

शिवसेनेकडून रविंद्र फाटक यांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपने बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे पालघर खासदार हेमंत सवरा, आमदार राजन नाईक आणि विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी बविआचे नेते आणि माजी महापौर राजीव पाटील यांची भेट घेतली.

या भेटीनंतर ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजप त्यांना पाठिंबा देऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बविआकडून क्षितिज ठाकूर यांच्या नावाचीही चर्चा रंगली असून शिवसेनाही त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. दरम्यान राजन नाईक यांनी माध्यमांना सांगितले की, अलीकडील भेटीगाठी केवळ सदिच्छा भेट असून विकास कामांसाठी घेण्यात आलेल्या भेटी आहेत. मात्र राजकारणात पुढे काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही.

Published on: May 28, 2026 3:31 PM
Follow Us