पुण्यातील आश्रम शाळेतील 41 विद्यार्थीनींची प्रकृती अचानक खालावली

पायाला मुग्या येणे, चक्कर येणे आणि सर्दी खोकला ही लक्षणे या मुलींना दिसत आहेत. त्यांना हा त्रास नेमकां कशामुळे झाला याबबात अद्याप काहीच माहिती मिळू शकलेली नाही. डॉक्टर या मुलींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. एकाच वेळी इतक्या मुली आजारी कशा पडल्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वनिता कांबळे

|

Aug 05, 2022 | 11:58 PM

पुणे : पुण्यातील(Pune) आश्रम शाळेतील(ashram school ) 41 विद्यार्थीनींची प्रकृती अचानक खालावली आहे. या सर्व विद्यार्थीनी गोहे येथील आदिवासी आश्रम शाळेतील आहेत. सर्व मुलींना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दहा ते बारा मुलींवर  मंचर उपजिल्हा रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. पायाला मुग्या येणे, चक्कर येणे आणि सर्दी खोकला ही लक्षणे या मुलींना दिसत आहेत. त्यांना हा त्रास नेमकां कशामुळे झाला याबबात अद्याप काहीच माहिती मिळू शकलेली नाही. डॉक्टर या मुलींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. एकाच वेळी इतक्या मुली आजारी कशा पडल्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आश्रमशाळेकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. मागील दोन ते तीन दिवसांपासून अनेक मुलींना त्रास जाणवत होता. आज तपासणी केली असता एकूण 41 मुलींना त्रास झाल्याचे समोर आले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें