MLC Election| आपण करू ते तत्वज्ञान अन् दुसरे करतील तो घोडेबाजार; चंद्रकांत पाटील यांची काँग्रेसवर सडकून टीका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन जागांच्या निवडणुका झाल्या. मात्र, काँग्रेसने शब्द देऊनही तो पाळला नाही. त्यामुळे निवडणूक झाली. चंद्रशेखर बावनकुळे खूप मोठ्या फरकाने विजयी झाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन जागांच्या निवडणुका झाल्या. मात्र, काँग्रेसने शब्द देऊनही तो पाळला नाही. त्यामुळे निवडणूक झाली. चंद्रशेखर बावनकुळे खूप मोठ्या फरकाने विजयी झाले. दोन्ही विजेत्यांचे अभिनंदन करतो. शिर्डीच्या साईबाबाचे वाक्य आहे. श्रद्धा आणि सबुरी. याचा आम्हाला फायदा झाला. काँग्रेसने या निवडणुकीत पोरखेळ केला, अशी टीकाचंद्रकांत पाटील त्यांनी यावेळी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पटोले आणि केदार यांचा संघर्ष या निवडणुकीत दिसला. विधानसभा अध्यक्ष पदाची गुप्त मतदान पध्दतीने निवडणुकी घ्या, मग तुम्हाला समजेल. विदाऊट मोदी या देशाचा विकास होणार नाही, हे लोकांना समजले आहे. माझे तिकीट कापले म्हणून मी नाराज, असे आमच्या पक्षाने आम्हाला शिकवले नाही, सब्र का फल मिठा होता है, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

