धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या शड्डूचा आवाज घुंमणार; नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार 65 वी कुस्ती स्पर्धा
राज्यात आता पुन्हा एकदा कुस्ती स्पर्धेचा थरार पहायला मिळणार असून शड्डू ठोकणाऱ्या पैलवाणांना शौकिनांना पाहता येणार आहे. राज्यात ता महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगणार असून ती धाराशिवमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे.
धाराशिव : राज्यातील कुस्ती शौकिनांसह कुस्ती पट्टूंची चिंता मिटली आहे. राज्यात आता पुन्हा एकदा कुस्ती स्पर्धेचा थरार पहायला मिळणार असून शड्डू ठोकणाऱ्या पैलवाणांना शौकिनांना पाहता येणार आहे. राज्यात आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगणार असून ती धाराशिवमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा हा थरार लाल माती व मॅट या 2 गटात होणार आहे. तर याची पाहणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकारी यांनी पाहणी केली. त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये होणार असल्याची घोषणा केली. 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. मानाची चांदीची गदा, सकार्पियो, 25 बुलेट, रोख रक्कम अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

