Dombivali CCTV | धावती लोकल पकडण्याच्या नादात महिला प्लटफॉर्मवर पडली, घटना सीसीटीव्हीत कैद

डोंबिवली रेल्वेस्थानकावरून सकाळी एक महिला डोंबिवली रेल्वे स्थानकाहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडत होती. इतक्यात लोकल सुरू झाल्याने सुरू झालेली लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असलेली महिला तोल जाऊन प्लटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये पडली.

मुंबई- डोंबिवली रेल्वे स्थानकावर एम एस एफ जवानाच्या सतर्कतेमुळे धावती लोकल पकडताना पडलेल्या महिलेचे प्राण वाचले आहेत. डोंबिवली रेल्वेस्थानकावरून सकाळी एक महिला डोंबिवली रेल्वे स्थानकाहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडत होती. इतक्यात लोकल सुरू झाल्याने सुरू झालेली लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असलेली महिला तोल जाऊन प्लटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये पडली. याच वेळी स्थानकावर कार्यरत असलेले एम एस एफच्या जवान विवेक पाटील व किरण राऊत यांचे या महिलेकडे लक्ष गेले. त्या दोघांनीही प्रसंगावधान राखत क्षणाचा ही विलंब न लावता त्या दिशेने धाव घेतली. महिलेला सुखरूप बाहेर ओढले. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं महिलेचा जीव वाचला. महिलेला बाजूला घेत बाकड्यावर बसवले. कुठे जखम वैगेरे झाली आहे का? याची विचारपूस केली. या घटनेचा सर्व थरार स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI