Eknath Khadse : नाथाभाऊंचं घर भामट्यांनी लुटलं, 7-8 तोळं सोनं लंपास, दिवाळीत बाहेर गेलेल्या खडसेंच्या घरी चोरी
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील शिवरामनगर येथील निवासस्थानी चोरी झाली आहे. खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेले असताना, चोरट्यांनी त्यांच्या घरातून अंदाजे सात ते आठ तोळे सोने लंपास केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील शिवरामनगर येथील मुक्ताई बंगल्यात दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकनाथ खडसे कुटुंबियांसह दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेले असताना, चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बंगल्याच्या तळमजल्यावरील तसेच पहिल्या मजल्यावरील खोल्यांमधील कपाटे तोडून त्यातील मुद्देमाल लंपास केला. यामध्ये अंदाजे सात ते आठ तोळे सोने चोरीला गेल्याची माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या तपासासाठी नियुक्त करण्यात आले आहे. टीव्ही 9 मराठीच्या किशोर पाटील यांनी चेतन शिंदे यांच्यासह जळगावहून ही माहिती दिली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

