Laxman Hake Threat : साताऱ्यातून जाऊन दाखव… लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?
फोनवरून देण्यात आलेली धमकी रेकॉर्ड करून तो कॉल लक्ष्मण हाके यांनी शेअर केलाय. ज्यात उठसूठ मराठ्यांना बोलतोय, मनोज जरांगे पाटील यांना बोलतोय. जरा साताऱ्यातून जाऊन दाखव, असं फोनवर बोलणारा व्यक्ती लक्ष्मण हाकेंना धमकावतोय.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. तो फोनकॉल रेकॉर्ड करून सरकारने लक्ष देण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तर धमकी आली असेल तर न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. फोनवरून देण्यात आलेली धमकी रेकॉर्ड करून तो कॉल लक्ष्मण हाके यांनी शेअर केलाय. ज्यात उठसूठ मराठ्यांना बोलतोय, मनोज जरांगे पाटील यांना बोलतोय. जरा साताऱ्यातून जाऊन दाखव, असं फोनवर बोलणारा व्यक्ती लक्ष्मण हाकेंना धमकावतोय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करा आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत. सर्वपक्षीय नेत्यांचे मोर्चेही निघालेत. तर ओबीसींना टार्गेट केलं जातंय असं म्हणत लक्ष्मण हाकेंनीही प्रतिमोर्चा काढलाय. मात्र आपण वाल्मिक कराडचं समर्थन केलं नाही असं लक्ष्मण हाके म्हणालेत. पण वाल्मिक कराडला जातीय भावनेतून टार्गेट केलं जात असल्याचे लक्ष्मण हाके म्हणालेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

