छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्…
छगन भुजबळ यांना १२ वेळी धमकीचे मेसेज आलेत. सौदागर सातनाक नावाच्या व्यक्तिच्या फोनवरून धमकी आल्याचा दावा करण्यात येतोय. यासंदर्भात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. यावरून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई, १ डिसेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी सभेतून भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर त्यांचा पलटवार देखील जरांगे पाटील यांच्या सभेतून होत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच छगन भुजबळ यांना १२ वेळी धमकीचे मेसेज आलेत. सौदागर सातनाक नावाच्या व्यक्तिच्या फोनवरून धमकी आल्याचा दावा करण्यात येतोय. यासंदर्भात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या लग्नासाठी भुजबळ छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. याचवेळी त्यांना एक फोन आला होता. पण त्यांनी तो उचलला नव्हता. मात्र यानंतरच त्यांना हे धमकीचे मेसेज सुरू झालेत. तब्बल १२ वेळा धमकीचे मेसेज आलेत. म्हणून भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. यावरून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)