Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून… पोलिसांची माहिती काय?
मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याच्या चालकासह एका रिक्षाचालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. तिघेही जखमी झाले असून, मुंबई पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत आणि घटनेमागचा हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्कजवळ अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. या घटनेत टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एका रिक्षाचालकासह एकूण तीन जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच, गुन्हे शाखेची पथकेही तपास करत आहेत. या गोळीबारामागे नेमका कोणाचा हात आहे आणि हल्ल्याचा उद्देश काय होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या तरी ही प्राथमिक स्वरूपाची माहिती असून, पोलीस लवकरच अधिकृत तपशील देतील अशी अपेक्षा आहे. बॉलिवूडमधील एका नामांकित अभिनेत्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितलं आहे की… अभिनेत्याला कोणतीच दुखापत झालेली नाही.
