Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट, ‘मी स्वतः दर महिन्याच्या 5 तारखेला…’
'आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन केवळ ५६% देता आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे महिनाभर कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचा पगार दरमहा ७ तारखेला त्यांच्या बॅक खात्यांत जमा करण्यात येईल', असं प्रताप सरनाईक म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांना पगार हा वेळेवर मिळाला पाहिजे, अशी मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होणार असल्याचे आश्वासन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले. आज मुंबईत बोलत असताना प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारासंदर्भात वचन देत दर महिन्याच्या ७ तारखेला पगार होणार असल्याचे सांगत आश्वस्त केले. ‘कोणत्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे दर महिन्याच्या ७ तारखेला मिळालेच पाहिजे. यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री या नात्याने मी स्वतः वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या पाच तारखेला जाऊन बसणार आहे.’, असे सांगितले. ज्या प्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो. त्याप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांना देखील वेळेवर पगार दिला पाहिजे. त्यासाठी वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काय वित्त विभागाकडे भीक मागत नाही. आम्ही आमचा अधिकार मागतोय, तो वेळेत मिळायला हवा, असे मत प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

