Dhananjay Deshmukh : तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Trupti Desai Visits Deshmukh Family : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी एसपी ऑफिसमध्ये काही पुरावे देखील सादर केले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांना त्यांच्याजवळ असलेले काही पुरावे दिले आहेत. यात आरोपी वाल्मिक कराड याच्या जवळचे असलेल्या 26 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे नावं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या भेटीनंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या भेटीत झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. यावेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, तृप्ती देसाई यांनी दिलेल्या पुराव्यांची शहानिशा होईल. त्यानंतर त्यावर पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई देखील केली जाईल. आज कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे याला प्रशासनातले कुचकामी लोकं जबाबदार आहे. जे कर्तव्यावर असताना देखील आरोपीसोबत फिरत होते. त्यांनी त्याच वेळी कारवाई केली असती तर आरोपी फरार झाला नसता, अशी खंत यावेळी धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.