सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्यासाठी पुण्यातील आक्रमक महिला नेतृत्व तयार; शिंदे-फडणवीस यांना घातली गळ
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई बारामती लोकसभा लढवण्यास इच्छूक आहेत. तृप्ती देसाई यांनी भाजप पक्षप्रवेशाचे संकेत दिलेत. बारामती मतदारसंघात प्रश्न सूटले नाहीत. मी निवडणूक लढवणार, असं त्या म्हणाल्या आहेत.
पुणे : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर असताना आता अनेकजण निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवत आहेत. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही बारामतीची जागा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. “बारामती मतदारसंघात भाजप आणि एकनाथ शिंदेंनी विचार केल्यास मी निवडणूक लढवेन. बारामती मतदारसंघात घराणेशाहीचं राजकारण आहे. सुप्रिया सुळे पुन्हा या मतदारसंघात फिरतायेत. यंदाही त्याच उमेदवार असतील. राज्यात देवेंद्र फडणवीसांच काम चांगलं आहे. त्यामुळे त्यांनी मला संधी द्यावी”, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. शिंदे-फडणवीस यांनी संधी द्यावी अन्यथा आम आदमी पक्षाकडूनही मला ऑफर आली आहे. पण राष्ट्रीय पक्षानं संधी दिल्यास कोणाला नको असेल?, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

