Pune Helicopter Crash : हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं अन् अवघ्या 3 मिनिटांत कोसळलं, पुण्यात मोठी दुर्घटना

पुण्यातील बावधन भागात हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

Pune Helicopter Crash : हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं अन् अवघ्या 3 मिनिटांत कोसळलं, पुण्यात मोठी दुर्घटना
| Updated on: Oct 02, 2024 | 10:22 AM

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील बावधन भागात एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या तिघांमध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळतेय. हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांतच हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्येच दोन पायलट आणि एका इंजिनिअरला आपला जीव गमवावा लागलाय. सध्या पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात धुकं पसरलं आहे. या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला.

Follow us
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.