Ajit Pawar : अजित दादा बीडमध्ये एन्ट्री करताच हे काय घडलं? ताफ्यासमोरच ‘त्या’ दोघांकडून आत्मदहनाचा प्रयत्न
बीडमध्ये अजित पवार यांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे तरुण कुंभेफळ गावातील असून ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत चौकशीची मागणी करत होते. घटना पोलिस ग्राउंडवरील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान घडली.
बीड येथे आज अजित पवार यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याची एक बातमी समोर येत आहे. बीडमध्ये अजित पवार यांची एन्ट्री होताच अजित पवार यांच्या ताफ्यासमोर दोन तरूणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. केज तालुक्यातील कुंभेफळ गावातील दोन तरुणांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. ही घटना पोलीस ग्राउंडवर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी घडली. तरुणांची मागणी होती की त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी करून ती ग्रामसभेत लोकांना कळवली जावी. त्यांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे निवेदनही दिले होते. मात्र त्यावर कोणताही विचार झाला नसल्याचे म्हणत तरूणांनी असे टोकाचे पाऊल उचचले.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

