Uday Samant Video : ‘मनोज जरांगे माझे मित्र पण…’, मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्यावरून मंत्री उदय सामंतांचा सल्ला
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही हतबल झाला होता, रडकुंडीला आला होतात पण याच मराठ्यांनी तुम्हाला गादीवर बसवलंय. पण आता तुम्ही मराठ्यांबाबत बेईमान होऊ लागला आहात. तुमची मस्ती जायला तयार नाही’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाहीतर उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना संयम बाळगण्याचा सल्लाही दिली आहे. ‘मनोज जरांगे पाटील यांना माझे मित्र म्हणून विनंती करायची आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलताना जरा संयम ठेवून बोललं पाहिजे. कारणं ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जनतेने निवडून दिलं आहे. कदाचित रागाच्या भरात असं होऊ शकतं. पण मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसोबत संवाद ठेवावा’, मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीवर मंत्री उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगला आणि मुलीच्या परीक्षेवरूनही टीका केली. ‘सागर बंगल्यावरून मुलीच्या परीक्षेसाठी वर्षावर जाता येत नाही तुम्ही म्हणाले. तुम्हाला तुमच्या पोरीच्या भवितव्याची चिंता आहे. इकडे आमच्या पोरांचे मुडदे पडायला लागलेत. आमचं उपोषण खोटं सांगून तुम्ही गोड बोलून आमचा काटा काढला’, असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले होते.

संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर

राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'

राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी

मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल
