Uday Samant : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत मनसे जातंय, हे दुर्दैव – उदय सामंत
उदय सामंत यांनी मनसेच्या काँग्रेससोबतच्या संभाव्य आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी कर्नाटकात काँग्रेसने शिवाजी महाराजांच्या नावाचे स्टेशन बदलून अपमान केला होता, असे सामंत म्हणाले.
मंत्री उदय सामंत यांनी मनसेच्या काँग्रेससोबतच्या संभाव्य राजकीय युतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत मनसे जात असल्याचे दुर्दैव त्यांनी व्यक्त केले. सामंत यांनी आठवण करून दिली की, पंधरा दिवसांपूर्वी कर्नाटकात काँग्रेसने शिवाजी महाराजांच्या नावाने जे रेल्वे स्टेशन होतं ते बदलून सेंट मेरीच्या नावाने केलं, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होता असं सामंत म्हणाले. मनसेच्या अध्यक्षांना कोणीतरी चुकीचे मार्गदर्शन करत असल्याचा दावाही उदय सामंत यांनी केला.
सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले. एकनाथ शिंदे यांनी स्वाभिमानाने निर्णय घेतले असून ते कोणत्याही प्रलोभनांना बळी पडले नाहीत, असे त्यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेना यांच्यातील राष्ट्रीय युती पुन्हा प्रस्थापित करण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी दाखवले, असे सामंत म्हणाले. काँग्रेसला बाजूला ठेवून ही युती करण्याचे काम देशात पहिल्यांदाच कोणी केले असेल तर ते एकनाथ शिंदे यांनी केले, असा अभिमान सामंत यांनी व्यक्त केला.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

