AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant : ... तर दंगल घडण्यापर्यंत अधिकाऱ्यानं....? मंत्री उदय सामंत यांचा 'त्या' माजी अधिकाऱ्याला सवाल

Uday Samant : … तर दंगल घडण्यापर्यंत अधिकाऱ्यानं….? मंत्री उदय सामंत यांचा ‘त्या’ माजी अधिकाऱ्याला सवाल

| Updated on: Oct 17, 2023 | 6:14 PM
Share

VIDEO | माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुणे हिंसाचाराबद्दलच्या 'त्या' आरोपांवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. सामंत म्हणाले, जर एखाद्या मंत्र्याबद्दल अधिकाऱ्यांना काही इनपूट असतील.. तर दंगल घडण्यापर्यंत अधिकाऱ्यानं का थांबावं?

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३ | माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच सुरूये. यामध्ये पुणे हिंसाचारावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करत नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. इतकंच नाहीतर दंगल पेटवण्यात याचा हात असल्याचे म्हटले आहे. यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. सामंत म्हणाले, ज्यावेळी मोठ्या पदावर आपण काम करत असतो. तेव्हा अनेक अधिकार आपल्याला असतात. त्यामुळे या अधिकारवाणीनं आपण काही वरिष्ठांना सांगू शकतो. जर एखाद्या मंत्र्याबद्दल अधिकाऱ्यांना काही इनपूट असतील.. तर दंगल घडण्यापर्यंत का थांबावं अधिकाऱ्यानं… असा सवालच उदय सामंत यांनी विचारलाय. इतकंच नाही तर त्याचवेळी कोणत्याही पक्षाचा तो नेता असेल त्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे होती. मात्र रिटायर्ड झाल्यानंतर काही लोकांना लक्ष्यकरून बदनाम केलं जातंय. रिटायर्ड झाल्यावर अशी पुस्तक संस्कृती पुढं यायला नको… निवृत्त झाल्यानंतर असे आरोप करणं योग्य की आयोग्य हे जनता ठरवेल, असे उदय सामंत म्हणले.

Published on: Oct 17, 2023 06:14 PM