Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE: हिंदी बोलणाऱ्यांना राज्य सांभाळता आलं नाही; राज ठाकरे कडाडले
Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE Updates in Marathi: ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यात आज राज ठाकरेंनी व्यासपीठावरून सरकारवर ताशेरे ओढले.
हिंदी बोलणाऱ्यांना राज्य सांभाळता आलं नाही. रोजगाराला इकडे येतात. आम्ही आम्ही हिंदी शिकायचं. पाचवी नंतर मुलं काय हिंदी चित्रपट सृष्टीत जाणार का? असा घणाघाती सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. आज वरळी डोम येथे होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यातून राज ठाकरेंनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, खरंतर हा प्रश्नच अनाठायी होता. गरज नव्हती. कुठून हिंदीचं आलं ते कळलं नाही. हिंदी. कशासाठी हिंदी? कुणासाठी हिंदी. लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही. कुणाला विचारायचं नाही. शिक्षण तज्ज्ञांना विचारायचं नाही. आमच्याकडे सत्ता आहे. आम्ही लादणार. तुमच्याकडे सत्ता असेल ती विधान भवनात. आमच्याकडे सत्ता आहे. ती रस्त्यावर. एक पत्र लिहिलं. दोन पत्र लिहिली. नंतर दादा भुसे आले. भुसेंना म्हटलं ऐकून घेईल. पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र कुठून आले. ते आलं ते केंद्र सरकार. राज्य आणि केंद्र सरकारच्या दुव्यासाठी हे त्रिभाषा सूत्र आलं. कोर्टात इंग्रजीतच काम होतं. कुठे आहे त्रिभाषा सूत्र. इतर राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला त्यांनी. दक्षिणेतील राज्य हिंग लावून विचारत नाही यांना. पण महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं आणि काय होतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली, अशीही टीका ठाकरेंनी केली.

भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण

Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले

एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'

भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?
