Sanjay Raut | उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदे आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात; राऊतांचा पलटवार
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना असंख्य पदं दिली आहेत. त्यांची जडणघडण केली आहे. ती जर केली नसती, तर 50-50 कोटींची आज जी क्षमता निर्माण झाली, ती झाली नसती. ती कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात असेल. उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदे आज फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बसले आहेत”
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानपरिषदेचा औपचारिक निरोप घेतला. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि त्यांनी ठाकरे यांना त्यांच्या सार्वजनिक सेवेबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिंदे म्हणाले, “माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो.” एकनाथ शिंदे यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.
यावर माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रतिक्रिया दिली की, “शिष्टाचार आहे. संस्कार आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना असंख्य पदं दिली आहेत. त्यांची जडणघडण केली आहे. ती जर केली नसती, तर 50-50 कोटींची आज जी क्षमता निर्माण झाली, ती झाली नसती. ती कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात असेल. उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदे आज फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बसले आहेत”
Published on: Mar 25, 2026 11:52 AM
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!

