Uddhav Thackeray Sabha BKC | गाढवाने लाथ मारण्याआधी आम्ही तुम्हाला सोडलं

गदा पेलवायला ताकद हवी. हनुमान भीमसारखे. आमचं हिंदुत्व गधाधारी असं फडणवीस म्हणाले. तो गधा आम्ही अडीच वर्षापूर्वी सोडून दिला. आम्ही गाढव सोडून दिलं. घोड्याच्या आवेशात होते, त्या गाढवाने लाथ मारण्यापूर्वीच आम्ही सोडून दिलं. बसा बोंबलत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि फडणवीसांवर केलीय.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 14, 2022 | 10:57 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावरुन भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी आमचं हिंदुत्व (Hindutva) हे गदाधारी हिंदुत्व आहे घंटाधारी नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचं हिंदुत्व आता गदाधारी नाही तर गधाधारी झाल्याची जोरदार टीका केली होती. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनीही पलटवार केलाय. ‘आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे आणि बाकीच्यांचं घंटाधारी असं मी म्हणालो होतो. त्यावर फडणवीस बोलले. आमचं हिंदुत्व होतं हे गधाधारी होतं पण आम्ही अडीच वर्षापूर्वी तुम्हाला सोडलं. जी गाढवं घोड्याच्या आवेषात होती त्यांनी लाथ मारायच्या ऐवजी आम्ही त्याला लाथ मारली’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें